दर्यापूर प्रतिनधी महेश बुंदे
त्रिपुरा येथील घटनेचा निषेध काही विशिष्ट समुदायाने अमरावती येथे करतांना ठराविक समाजाला लक्ष केले याचा निषेध म्हणून भाजपाच्या वतीने दि. १४ नोव्हेंबर रविवार रोजी दर्यापूर ग्रामीण व शहर भागात बंद पाळण्याचे आवाहन भाजपा दर्यापूर तर्फे करण्यात आले होते.
बंद पाळताना शांततापूर्ण मार्गाने केवळ निषेध नोंदविला, कुठलीही अनुचित घटना होऊ नये याची काळजी घेऊन शिवाजी चौक, जयस्तंभ चौक, व इतर परिसरात रॅली काढण्यात आली. शहरातील सर्व दुकानदार, फुटपाथ,छोटे मोठे व्यवसायिक, दुकानदार यांनी स्वयंस्पुर्तीने आपापली दुकान बंद ठेऊन सहकार्य केले या रॅलीमध्ये तालुका अध्यक्ष माणिकराव मानकर, शहराध्यक्ष नाना माहोरे, अनिल कुंडलवाल, विजय मेंढे, कमलेश भट्टड, रवींद्र कावरे, अतुल गोळे, संजय कांबे, मनोज नावडकर, निलेश गावंडे, सुधीर वानखडे, रोशन कट्यारमल, निलेश निर्मळ, मयूर लांडे, कमलेश भट्टड पराग दंडवते, दीपक उपाध्याय, अमोल धोटे, अरविंद पावडे, रोशन अग्रवाल, शशांक देशपांडे, महेश बुंदे, राजू यांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवला.
