बालक हे देशाचे भविष्य आहे-न्या.शैलजा सावंत, बाल दिन व आजादी का अमृत महोत्सवाचा समारोप

प्रतिनिधी फुलचंद भगत:-

वाशिम:-बालक हे देशाचे भविष्य आहेत. त्यांनी शिक्षण घेऊन खूप मोठे व्हावे. राष्ट्राची व आई-वडिलांची सेवा करावी, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा न्या. श्रीमती शैलजा सावंत यांनी केले.


14 नोव्हेंबर रोजी जिल्हा न्यायालय येथे बालदिन आणि आजादी का अमृतमहोत्सव समारोपाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन न्या. श्रीमती सावंत बोलत होत्या. यावेळी न्या.डॉ. श्रीमती रचना तेहरा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. संजय शिंदे. न्या आर.डी. शिंदे, जिल्हा विधीज्ञ संघाचे सचिव ऍड एन टी जुमडे, सहसचिव ऍड विनोद सानप यांची प्रमुख उपस्थिती होती.


न्या.डॉ. श्रीमती तेहरा यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत बालकांसाठी बालक स्नेही विधी सेवा बालकांचे संरक्षण योजना – 2015 या विषयावर, न्या.आर.पी.शिंदे यांनी शिक्षणाचा अधिकार, पोलीस कॉन्स्टेबल दीपक घुगे यांनी सायबर गुन्हे याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमांमध्ये सर्व अंध मुलांचा सहभाग असलेला चेतन सेवा अंकुर आर्केस्ट्रातील कलावंतांनी देशभक्ती आणि बाल गीत सादर करून उपस्थितांची प्रशंसा मिळविली. आजादी का अमृत महोत्सव समारोप निमित्ताने पदयात्रा काढण्यात आली.


प्रास्ताविकातून न्या. शिंदे यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव व अखिल भारतीय जाणीव जागृती अभियानांतर्गत 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर 2021 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या विविध कायदेविषयक शिबिराची माहिती दिली.
कार्यक्रमाला सर्व न्यायिक अधिकारी, जिल्हा विधीज्ञ संघाचे पदाधिकारी, विधिज्ञ मंडळी, न्यायालयातील कर्मचारी व बालके मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन न्या.श्रीमती एस.व्ही. फुलबांधे यांनी केले. उपस्थितांचे आभार न्या.आर.टी. कुलकर्णी यांनी मानले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!