‘दंगा काबू’ योजनाही पार
प्रतिनिधी फुलचंद भगत:-
वाशिम:-अलिकडील काळात त्रिपुरा राज्यात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदमध्ये वाशिम
जिल्हयाच्या शेजारील जिल्हयांमध्ये काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या असून त्याअनुषंगाने
जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांनी जनतेस खालील प्रमाणे आवाहन केले आहे.
वाशिम जिल्हयात शांतता कायम ठेवण्याकरिता जातीय दृष्टया संवेदनशिल ठिकाणी फिक्स
पॉईंट बंदोबस्त नेमण्यात आला आहे. पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि बिट मार्शल हे सतत आपापल्या कार्यक्षेत्रात सतर्क पेट्रोलिंग करित आहेत.
कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी जास्तीत जास्त संख्येत मनुष्यबळ लाठी, हेल्मेट, ढाल सह पोलीस स्टेशनला राखीव ठेवण्यात आले आहे. शांतता समिती व समाजातील प्रतिष्ठित लोकांच्या सभा आयोजित करून त्यांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सायबर सेल हे सतत सोशल माध्यमांवर लक्ष ठेउन आहे. सदर गंभीर परिस्थतीची वाशिम पोलीस दल बारकाईने निरीक्षण करीत आहे. सद्यस्थितीत वाशिम जिल्हयात कोठेही कायदा व सुव्यवस्थेची किंवा हिंसाचाराची परिस्थिती नाही.
परंतु जर कोठेही हिंसाचाराची घटना घडत असल्यास त्याविरूध्द तात्काळ कठोर कारवाई करण्यात येईल.मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन हद्यीत ‘रूट मार्च’ व ‘दंगा काबू’ योजना आयोजित करण्याचे आदेशित केले होते. त्यानुसार वाशिम जिल्हयातील वाशिम शहर पोलीस स्टेशन व पोलीस मुख्यालय मधील अधिकारी व अंमलदार यांचे आज दि. १४/११/२०२१ रोजी ‘संयुक्त रूट मार्च’ व ‘दंगा काबू योजना’ आयोजित
करण्यात आली होती.
