सौ.परिषाताई सरनाईक, स्थानिक नगरसेविका आणि अध्यक्षा विहंग चारिटेबल ट्रस्ट तसेच रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी यांच्या माध्यमातून आज आदिवासी मुलांसाठी बालदिनानिमित्त एक मनोरंजन कार्यक्रम राबवण्यात आला होता यामध्ये मुलांनी भरपूर धमाल केली.
यावेळी रोटरी क्लबचे प्रेसिडेंट नीलम मॅडम, प्रसाद दादा, परेश भाई, अनुजा टिपणीस, वीरेंद्र शहा, देवेंद्र भाई आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्ट चे सदस्य या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तसेच येऊरचे शिवसेनेचे उपविभाग प्रमुख हेमंत जाधव, शाखाप्रमुख रमेश वळवी, मल्लखांब प्रशिक्षक किशोर म्हात्रे तसेच महिला शाखासंघटक पूजा हिंदोळे हे देखील उपस्थित होते.
कोरोना अजूनही संपलेला नाही आणि प्राथमिक शाळा देखील सुरू झालेल्या नाहीयेत म्हणून मुलांसाठी थोडा विरंगुळा म्हणून हा कार्यक्रम राबवण्यात आला होता. मागील पाच वर्षापासून विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बालदिनाचा कार्यक्रम राबविण्यात येतो परंतु मागीलवर्षी कोरोणामुळे हा कार्यक्रम राबवण्यात आला नाही.
पण यावर्षी छोटेखानी का होईना कोरोनाचे सर्व नियम पाळून कार्यक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाला अंदाजे 200 मुलांनी उपस्थिती दाखवली आणि भरपूर धम्माल केली त्याबद्दल पालकांनी सौ. परीषाताई सरनाईक यांचे आभार मानले आहेत.