वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ४ था वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला.
वर्धापनदिन सोहळ्याचे आज डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे येथे उद्घाटन संपन्न झाले. या सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मा.मुख्यमंत्री ना.श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कोविड महामारीच्या पहिल्या तसेच दुसऱ्या लाटेतील संक्रमण रोखण्यासाठी केलेले कार्य अनुलेखीत केलेल्या ‘योद्धा’ या पुस्तकाचे विमोचन सोहळ्याचे उद्घाटक त्रिपुरा,बिहार आणि प.बंगाल चे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील आणि शिवसेना खासदार श्री.संजय राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या सोहळ्याच्या पहिल्या सत्रात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या ‘वेबसाईट’ व ‘मोबाईलॲप’ चे उद्घाटन पार पडले. तसेच परिसंवादाचे सूत्र संचालन न्यूज १८ लोकमत चे जेष्ठ पत्रकार श्री. मिलिंद भागवत यांनी केले.
या कार्यक्रमात शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब, आमदार श्री.प्रताप सरनाईक, ठाणे शहराचे महापौर श्री.नरेश म्हस्के, आमदार बालाजी किणीकर, आमदार श्री. रविंद्र फाटक, झी २४ तास वृत्तवाहिनी चे मुख्य संपादक श्री.निलेश खरे, सिने अभिनेते श्री.शरद पोंक्षे, जुपिटर हॉस्पिटल येथील हृदयरोग तज्ञ श्री. विजय सुरासे, जेष्ठ पत्रकार श्री. संतोष आंधळे, जेष्ठ पत्रकार श्री. संदीप आचार्य, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी आणि सहकारी सहभागी झाले होते.