५०० गजानन भक्तांनी पारायणनामध्ये घेतला भाग
दर्यापूर – महेश बुंदे
श्री गजानन महाराज भक्त मंडळ यांच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून श्री गजानन महाराज विजय ग्रंथ महापारायनाचे आयोजन करण्यात येत आहे. मागील वर्षी कोरोनामुळे छोट्या स्वरूपाचे हे आयोजन करण्यात आले होते. त्याच प्रमाणे यावर्षी सुद्धा पारायणाचे आयोजन दि. १४ नोव्हेंबर रविवार रोजी अमरावती रोडवरील प्रसाद मंगल कार्यालय या ठिकाणी करण्यात आले आहे. पारायणाच्या पूर्वसंध्येला अगोदरच्या दिवशी होम हवन करण्यात आले त्यामध्ये सतीश भारसाकळे, तुळशीदास धांडे, विजयराव हावरे, शिवानंद चव्हाण, राजू देशमुख, आधी सपत्नीक होम हवन मध्ये बसले होते. या पारायणाला सकाळपासूनच भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली.

या विजयगंस्थ महा पारायणाचे वाचन ठाणे येथील विद्याताई पडवळ यांच्या मुखतगत वाणीतून करण्यात आले आहे. सर्व भक्तांना चहा-नाश्ता व जेवण्याची व्यवस्था सुद्धा यावेळी गजानन महाराज सेवा समितीच्या वतीने करण्यात आली होती. नेहमी प्रमाणे यावर्षी सुद्धा श्रीच्या महिला भक्ताचे पचंड गर्दी महा पारायणाला दिसून आली. चार वाजता महापारायण्याचा समारोप महाआरतीने करण्यात आला,.
