दर्यापूर – महेश बुंदे
त्रिपुरा येथील घटने संदर्भात व अमरावती येथे काढण्यात आलेल्या निषेध मोर्चा दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या पार्श्वभूमीवर दि. १३ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी दर्यापूर शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांनी सभेमध्ये गावात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, व्हाट्सअप, फेसबुकवर आलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले.
