ठाणे प्रतिनिधी नीरज शेळके:-
पाईपलाईन कार्यान्वित झाल्यावर दिवा शहर परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार…
दिवा शहर आणि परिसरातील पाणी टंचाईच्या प्रश्न कायम स्वरुपी सोडविण्याकरिता सातत्याने प्रयत्नशील राहुन करत असलेल्या पाठपुराव्यामुळे आता पलावा पासून पुढे दिवा शीळ मार्गावरील ८०० एमएमची पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या कामात येत असलेला जमिनीच्या एनओसीचा अडसर दूर झाला असून आज पासून या पाईपलाईन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन कल्याण डोंबिवली लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ झाला. काम पूर्ण होऊन पाईपलाईन कार्यान्वित झाल्यावर दिवा शहरामधील पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटण्यास मदत होणार असून दिवावासीयांना पाणी टंचाईच्या समस्येपासून मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे असे शिंदे यांनी सांगितले.

याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, ठाणे मनपा माजी महापौर रमाकांत मढवी, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, मा.नगरसेवक रमेश म्हात्रे, नगरसेवक शैलेश पाटील, अमर पाटील, दीपक जाधव, अर्जुन पाटील, नगरसेविका दिपाली भगत, अंकिता पाटील, दर्शना म्हात्रे, सुनिता मुंडे, ठाणे मनपा शहर अभियंता अर्जुन अहिरे आणि संबंधीत ठाणे मनपा प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

