Post Views: 543
लासुर गयाटी नाल्याजवळ अज्ञान वाहनाने दिली धडक
दर्यापूर – महेश बुंदे
तालुक्यातील व लासुर पंचक्रोशीतील सर्वपरिचित घुंगशी येथील रहिवासी अवलिया राजा उर्फ राजू देशमुख यांचा दि. १३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता अपघाताने दुर्दैवी मृत्यू झाला असून अकोला रोडवरील लासुर गयाटी नाल्याजवळ अज्ञान वाहनाने जबर धडक दिल्याने घटनास्थळी त्याचा मृत्यू झाला,.
ते सौंदळी फाट्यावरील भागवत सप्ताह कार्यक्रम येथून जेवण करून लासुर येथे जात असताना ही घटना घडली. धडक दिलेल्या वाहन चालक गाडी घेऊन फरार झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच लासुर पंचक्रोशीतील असंख्य नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच येवदा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित झाले व मृतदेह दर्यापूर येथील शासकीय रुग्णालयात पुढील कारवाई करिता रवाना करण्यात आला. येवदा पोलीस घटनेची पुढील चौकशी करत आहे.
सदर इसम हा सर्व तालुक्यात व लासुर पंचक्रोशीतील गावात “अवलिया राजा”म्हणून परिचित होता. सर्व भागवत, कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमात तो न चुकता जात होता, ज्या गावात भागवत आहे तेथे तो आठ दिवस मुक्काम करत होता, जे मिळेल ते जेवणे, तेथेच झोपणे हीच त्याची दिनचर्या होती. बाकी दिवस तो लासुर येथे राहत होता. मुर्तिजापूर तालुक्यातील घुंगशी हे त्याचे मूळ गाव असून त्याचे नातेवाईक सुद्धा तेथे राहतात. अवलिया असताना आयुष्यभर कोणाला कधीही त्रास न दिल्याने या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.