Post Views: 413
अंजनगांव सुर्जी – महेश बुंदे
स्थानीक श्रीमती राधाबाई सारडा कला वाणिज्य व विज्ञान महाविघालय, अंजनगांव सुर्जी येथील वनस्पतीशास्त्र विभागाची बी. एस. सी. भाग – ३ ची विद्यार्थीनी कु. अनुजा गजानन मंडवे हिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सह सुविधा केंद्र राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ आयुष मंत्रालय भारत सरकार द्वारा आयोजीत अमृता फॉर लाईफ या मोहीमे अंतर्गत औषधी वनस्पती या विषयावर राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेमध्ये राज्यातुन तीसरा क्रंमाक पटकावुन महाविघालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
कार्यक्रमांचे अध्यक्ष श्री. रणजीत पुराणीक व्यवस्थापकीय संचालक धुतपापेश्वर व श्री. राजेशजी पांडे सदस्य व्यवस्थापन परिषद सावित्रीबाई फुले पुणे विघापीठ यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र व ४०००/- रुपयाचा धनादेश देवुन सत्कार करण्यात आला.
महाविघालयाचे प्राचार्य डॉ.वशिष्ट चौबे यांचे हस्ते व वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.मंगेश डगवाल, शिक्षक श्री.रामचंद्र कुळकर्णी, डॉ.बीना राठी, डॉ.सत्येन्द्र गडपायले, डॉ.जुगल मालधुरे, डॉ. इंदल जाधव, प्रा महेन्द्र गिरी अधिक्षक, श्री.बी.एल.म्हसाळ, पालक श्री.गजानन मंडवे तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत अनुजा मंडवे हिने प्राप्त केलेल्या घवघवीत यशाबद्दल तीचा सत्कार करण्यात आला. सारडा एज्युकेशन सोसायटी चे सचिव डॉ.अमर सारडा , संचालक मंडळ, यांनी तीचे अभिनंदन व कौतुक केले. तीने आपल्या यशाचे श्रेय तीचे आई वडील, प्राचार्य डॉ.वशिष्ट चौबे व मार्गदर्शक वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मंगेश डगवाल यांना दिले आहे.