एक ऊब जाणिवेची ठरली वंचितांसाठी देवदूत
प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-मदत तुमची छोटी मोठी हास्य येईल कुणाच्या तरी ओठी हे ब्रीदवाक्य घेऊन कारंजा मानोरा परिसरात एक ऊब जाणिवेची ही संस्था गेली तीन वर्षांपासून समाजातील वंचित घटकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवित आहे. ज्यांना कोणी आधार नाही मनोरुग्ण दिव्यांग अशा व्यक्तींना किराणा किट देण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून एक ऊब जाणिवेची सातत्याने करीत आहे. एक ऊब जाणिवेची या संस्थेने काही कुटुंबही दत्तक घेऊन त्यांना दर महिन्यांला किराणा पोहचवण्याचे काम प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन केल्या जाते.
