गडचिरोली वार्ता ब्युरो रिपोर्ट :- महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापट्टीच्या जंगलात शनिवारी महाराष्ट्र पोलिसांच्या C-60 युनिट आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी 26 नक्षलवादी ठार केले असून चकमकीत चार जवान जखमी झाले आहेत.
गडचिरोलीचे एसपी अंकित गोयल यांनी याला दुजोरा दिला आहे.

गडचिरोली पोलिस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये नक्षलवाद्यांचा प्रमुख सर्वात टॉपचा नक्षल कमांडर आणि 50 लाखांचं बक्षिस असलेला मिलिंद तेलतुंबडे मारला गेला असल्याचे शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलिसांनी शनिवारी गडचिरोलीत 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. गडचिरोली जिल्ह्यात सकाळी सात वाजल्यापासून ही कारवाई सुरू होती. या कारवाईत 4 पोलिसही जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी हेलिकॉप्टरने नागपूरला पाठवण्यात आले आहे. गडचिरोलीचे एसपी अंकित गोयल यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्र पोलिसांच्या C-60 पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. 1990 मध्ये नक्षलवादी हिंसाचाराचा सामना करण्यासाठी C-60 पथक तयार करण्यात आले. नुकतेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही C60 कमांडोना क्रॅक कमांडो म्हणत त्यांचे कौतुक केले होते. या चकमकीत पोलिसांनी नक्षलवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील अकराबत्ती, कोटगुल परिसरातील जंगलात नक्षलवाद्यांनी छावणी उभारल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
यानंतर C-60 नावाच्या पोलिस पथकाने नक्षलवाद्यांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला. यानंतर पथक शोध मोहिमेसाठी रवाना झाले. पोलिसांचे पथक तळांजवळ पोहोचताच नक्षलवाद्यांना याची माहिती मिळाली. नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्यानंतर पोलिसांनीही प्रत्युत्तर देत गोळीबार सुरू केला. बरेच तास चाललेल्या या अत्यंत महत्त्वाच्या ऑपरेशनमध्ये 26 नक्षलवादी ठार झाले.
2 लाखांचे बक्षीस आहे
काही दिवसांपूर्वी पोलिसांनी दोन लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या मंगरू मांडवी या नक्षलवाद्याला येथून अटक केली होती. नक्षलवादी मंगरूवर खून, पोलिसांवर हल्ला असे अनेक गुन्हे दाखल आहेत. ठार झालेल्यांमध्ये काही बड्या बेनामी नक्षलवाद्यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.
कोण आहे मिलिंद तेलतुंबडे उर्फ सह्याद्री?
- 50 ला रुपयांचा इनाम असलेला नक्षलवाद्यांचा सर्वात मोठा नेता.
- मावोवादी सर्वोच्च सेंट्रल कमिटीचा सदस्य.
- एलगर परिषदेतील फरार आरोपी.
- एल्गारमधील कारावासात असलेला दुसरा आरोपी डॉक्टर आनंद तेलतुंबडेचा भाऊ.
- पश्चिम भारताचे काम ज्यात महाराष्ट्र मुख्य ह्याचा प्रभारी.
- जंगल आणि अर्बन ह्या क्षेत्रातील दोन्हीवर कामाचा अधिकार.
- एमएमसी म्हणजे महाराष्ट्र, छत्तीसगड व मध्य प्रदेश तिन्ही राज्यांचा एमएमसी असा गुरीला झोन याने विकसित केला आहे.
- अँजेला सोनटक्के ही त्याची पत्नी. ही सुद्धा मावोवादी म्हणून पकडली गेली होती.
- मिलिंद हा वणी – राजुरा परिसरात लहानाचा मोठा झालेला.
- शहरी भागात मावोवादी संघटनांमध्ये दलित समाजातील तरुणांना भरती करण्याचे विशेष लक्ष.
- शस्त्र ट्रेनिंग देणे, ऑपरेशनला मान्यता देणे हे सुद्धा कामाचा भाग. त्यामुळे ज्या शेकडो हत्या गेलं दशकभर पोलीस व सामान्य नागरिकांच्या मावोवाद्यांच्या हाती झाल्या त्याला जवाबदार.
दुसरीकडे, छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात गेल्या एका आठवड्यात दोन वेगवेगळ्या चकमकीत 4 नक्षलवादी ठार झाले आहेत. यापैकी 3 महिला माओवादी आहेत. या चार नक्षलवाद्यांवर छत्तीसगड सरकारने प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. ठार झालेली महिला नक्षलवादी कट्टर माओवादी होती. या महिलांनी अनेक मोठ्या नक्षली कारवाईत सहभागी होत्या.
