अवैध दारू विक्री प्रकरणी आरोपीस ३ वर्ष सश्रम कारावास,25000रु. दंड

अमरावती प्रतिनिधी :- अमरावती ग्रामीण जिल्हयातील पोलीस स्टेशन ब्राम्हणवाडा थडी अंतर्गत अप १४८/१६ कलम ६५ (ड) म.दा. कायदया अन्वये दिनांक ३०/०७/२०१६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर घटनेची हकीकत अशा प्रकारे आहे की, यातील नमुद घटना ता. वेळी व ठिकानी यातील आरोपी बबलु ग्यासुददीन खैरुददीन ईनामदार वय ३६ वर्ष रा.ब्राम्हणवाडा थडी यांचे गुप्त बातमीवरुन प्रो. व्हि रेड केली असता नमुद आरोपीचे ताब्यात एका थैलीत १० नग देशी दारुच्या पावठया १८० एम.एल. चा माल पंचा समक्ष जप्त करुन ताब्यात घेतला. वरुन सदरचा गुन्हा दाखल दाखल करून तपासात घेतला.

सदर प्रकरणी चांदुरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने अवैध दारु विक्री प्रकरणी आरोपीचा दोष सिद्ध झाल्याने दिनांक १०/११/२०२१ रोजी आरोपीस कलम ६५ (ड) म. दा. कायदया मध्ये ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली व रुपये २५,०००/- रु चा दंड न भरल्यास ६ महीने साधा कारावासाची शिक्षा ठोठावली.

सदर प्रकरणी सरकारी अभियोक्ता श्री वानखडे, तत्कालीन ठाणेदार सपोनी श्री अजय आखरे यांचे मार्गदर्शन खाली तपासी अधिकारी नापोकॉ निलेश वासनकर यांनी सदर गुन्हयाचा तपास करुन न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते.

पोलीस विभागातर्फे मा. पोलीस अधिक्षक श्री अवीनाश बारगळ, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री शशिकांत सातव साहेब यांचे मार्गदर्शनाखाली विध्यमाण ठाणेदार सपोनि पंकज दाभाडे यांनी वेळेवर साक्षीदार ला हज़र करुन ब्रिफींग केली जिल्हा पैरवी अधिकारी पोउपनि संदीप मडावी, पैरवी अधिकारी स.पोलिस उपनि विजय अवचट, ना पोकॉ बाळु चव्हाण, नापोकॉ मिलींद इंगोले, मपोकॉ चैताली शेळके तसेच पैरवी अधिकारी यांनी ती कामगीरी केली.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!