अमरावतीत आंदोलनाने घेतले चांगलेच हिंसक वळण,तीन दिवस इंटरनेट सेवा बंद

अमरावती : अमरावतीत आंदोलनाने चांगलेच हिंसक वळण घेतले आहे. त्रिपुरा घटनेच्या निषेध करताना दुकान बंद करण्यावरून दगडफेक करण्यात आली होती. शनिवारी बंद घोषित केल्यानंतरही चांगलेच वादंग निर्माण झाले. प्रभारी पोलिस आयुक्त संदीप पाटील यांनी दुपारी दोन वाजता पासून शहरात कलम १४४ जमाबंदी लागू केले आहे. 

परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून अमरावती शहरात संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. आता तीन दिवस इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. तसेच अमरावती मध्ये 4 दिवसांसाठी हा जनता कर्फ्यु लावण्यात आला असून एसआरपीएफच्या 5 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.अमरावती मधील एकूणच तणाव पांगवण्यात पोलिसांना मोठी पराकाष्टा करावी लागत आहे

त्रिपुरा येथील हिंसाचाराच्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी शुक्रवारी मुस्लीम समाजाच्या संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले. त्यानंतर शहराच्या काही भागांत दगडफेक झाली. त्यात व्यावसायिकांचे नुकसान झाले. त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी भाजप तसेच अन्य संघटनांसह शेकडो नागरिकांनी रस्त्यावर उतरून तीव्र निषेध केला.

राजकमल चौकात हजारोंच्या संख्येने पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र जमून निदर्शने केली. शहरातील संवेदनशील परिसर असलेल्या राजकमल चौक, नमुना, जवाहर गेट, जवाहर रोड येथे असलेल्या प्रतिष्ठानात घुसण्याचा प्रयत्न जमावाने केला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर पाण्याचा मारा केला.

अमरावतीत पोलिसांचा तगडा पोलिस बंदोबस्त लावल्यानंतर आज बंददरम्यान झालेल्या तोडफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयातर्फे संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर काही तोडफोडीच्या घटना घडल्या. त्यानुसार फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ (१), (२), (३) अन्वये पोलिस आयुक्त कार्यालयाकडून संचारबंदी आदेश लागू करण्यात आला.

पोलिस आयुक्तांनी सुटी केली रद्द

अमरावतीत बंददरम्यान हिंसाचार व जाळपोळ अशा प्रकारच्या घटना घडल्या. यामुळेच रजेवर असलेल्या पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी तातडीने शनिवारी रात्रीपर्यंत शहरात परतण्याचा निर्णय घेतला आहे.

स्पष्ट उल्लेख नाही

हिंसाचार व जाळपोळ अशा घटना घडल्यानंतर आयुक्तालयाच्या हद्दीत अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली आहे. तीन दिवस शहरातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय पोलिस आयुक्तांनी घेतल्याची माहिती दिली. मात्र, ही बंदी कधी लागू होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पाच पोलिस कर्मचाऱ्यांसह काही युवक जखमी

शहरातील राजकमल चौक, अंबापेठ येथे दुचाक्यांसह कारची जाळपोळ करण्यात आली. सौम्य लाठी हल्ल्यासह अश्रूधुरांच्या नालकांड्यासह जमावाला पंगविण्यासाठी प्लॅस्टिक बुलेटचा वापर पोलिसांनी केला. लाठीमार व दगडफेकीत पाच पोलिस कर्मचाऱ्यांसह जमवातील काही युवक जखमी झाले आहेत.

अमरावती बंदचे हिंसक रुप पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता दिलीप वळसे पाटलांनी शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. यासोबत त्यांनी समाजात द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाराष्ट्र सरकारकडे अमरावतीमधील दंगलीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच जर कारवाई केली नाही तर हे प्रकरण हाताबाहेर जाईल असा इशारा दिला आहे. दरेकर म्हणाले की, मला वाटतं त्रिपुरामध्ये घटना झाल्यानंतर अशा प्रकारचा उद्रेक इथे होता कामा नये. इथे दंगल करत असाल तर महाराष्ट्र सरकारने तात्काळ कारवाई करावी कारण अशा प्रकारचे जातीय तणाव निर्माण होणार असेल तर, तो महाराष्ट्रासाठी योग्य राहणार नाही. मग आशा प्रवृत्ती त्रिपुरात घटना घडते आणि इथे दादागिरी कराल तर महाराष्ट्रात चालणार नाही. सरकारने यावर कारवाई करावी अन्यथा हाताबाहेर प्रकरण जाईल असे दरेकर म्हणाले.

धगधगते परिसर

>> राजकमल चौक
>> नमुना गल्ली
>> ऑटो गल्ली
>> इतवारा परिसर,
>> पठाण चौक
>> सरोज चौक
>> सराफा मार्केट, कपडा मार्केट
>> जव्हारद्वार

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!