रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी…!

दर्यापूर – महेश बुंदे

दर्यापूर तालुक्यातील लेहेगाव येथे शेतात हरभऱ्याची पेरणी झाल्यानंतर पाहणी करीत असलेल्या शेतकऱ्यावर रानटी डुकराने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना दि. १३ नोव्हेंबर रोज शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. विलास माहोरे असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.

त्याला पुढील उपचाराकरिता रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. विलास माहोरे हे स्वतःच्या लेहेगाव असलेल्या शेतात हरभरा पाहणी करण्याकरिता गेले होते. लपून बसलेल्या रानडुकराने विलासवर हल्ला करून गंभीर जखमी केले. जखमी शेतकऱ्यास उपाचाराकरिता रुग्णालयात करण्यात आले होते. सध्याच्या परिस्थितीत रानडुकरांच्या वाढत्या संख्येने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतात लावलेले पीक नष्ट करणे, शेतकऱ्यांवर हल्ला करणे, अशा अनेक प्रकारचे नुकसान रानडुकरामुळे होत असून, शासनाने याचा त्वरित बंदोबस्त करावा, अथवा मारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी दर्यापूर भाजपाचे शहराध्यक्ष नाना माहुरे यांनी केली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!