अमरावती सुभाष कोटेचा:-
शुक्रवार 12 नोव्हेंबर रोजी अमरावती शहरात संघटित गुन्हेगारीने नंगा नाच घालून शहरात लूटमार, तोडफोड आणि दगडफेक करण्यात आली. पोलिस यंत्रणा मूकदर्शक बनली होती. संपूर्ण अमरावती शहर प्रचंड दहशतीत होते. शहराला वाचवण्यासाठी राज्य शासनाच्या सर्व यंत्रणा अपयशी ठरल्या. परिणामी मुस्लिम समाजाने काढलेला मोर्चा लोकशाहीची पायमल्ली करणारा ठरला. आम्ही या मोर्चाचा तीव्र शब्दात निषेध करतो. भारतीय जनता पार्टी अमरावती जनतेच्या पाठीशी उभी आहे.
