ठाणे प्रतिनिधी नीरज शेळके :-
जलकुंभांच्या जागेपोटी द्यावा लागणारा रु. ८०कोटीचा मोबदला माफ करण्याच्या मागणीवर ठाणे जिल्हाधिकारी यांचा सकारात्मक प्रतिसाद…
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांमध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे पाण्याच्या मागणीतही वाढ झाली असून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. यावर कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी अमृत योजनेची घोषणा करण्यात आली असून त्यासाठी १९० कोटींची पाणी पुरवठा योजनेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये पाणी उचल केंद्र, पाणी पुरवठा केंद्र, जल शुद्धीकरण केंद्र आणि जलवाहिन्या टाकण्याचे काम केले जाणार आहे. पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जलकुंभ (ElevatedStorageReservoir) उभारण्यात येणार असून यातील ९ ठिकाणच्या जागा शासनाच्या मालकीच्या असून त्यांचा रु.८० कोटींचा मोबदला देणे खर्चिक ठरणार आहे.
