साईनगर, भीमज्योत कॉलोनीत स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा

अमरावती-पद्माकर मांडव धरे:-

आपल्या जिल्ह्यातील विध्यार्थी व युवक, युवती आयएएस, आय पी एस व्हावे युवक, युवतींना यूपीएससी, एमपीएससी, बैंक ऑफीसर, इत्यादीचा अभ्यास करण्यासाठी उत्कृष्ट व्यवस्था, संपूर्ण ग्रँथ संदर्भ सूची स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा दि.13/11/2021ला साय.6वाजता जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती मा. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.

या प्रसंगी कार्यक्रम चे अध्यक्ष महापौर मा. श्री. चेतन भाऊ गावंडे राहणार असून शालेय शिक्षण राज्य मंत्री मा. श्री. बच्चू भाऊ उर्फ ओमप्रकाश कडू, खासदार श्रीमती नवनीत रवी राणा, ह्या राहणार आहेत तर विशेष उपस्थिती मध्ये आ. श्री. प्रवीण पोटे पाटील ,आ. श्री .रणजित पाटील, आ. श्री. किरण सरनाईक, आ. श्री. रवी राणा, आ. श्रीमती सुलभा सं. खोडके, उपमहापौर श्रीमती कुसुम साहू, अमरावती महानगरपालिका सभागृह नेता श्री. तुषार भारतीय, स्थायी सभापती श्री. सचिन रासने, विरोधी पक्ष नेता श्री. बबलू शेखावत, गटनेता श्री. डॉ. रवींद्र तायडे, बसपा नेता श्री. चेतन पवार, अपक्ष गटनेता श्री. दिनेश बुब, एम आय एम गटनेता श्री. अब्दुल नाजीम, नगरसेविका श्रीमती मंजुषा जाधव, श्रीमती रेखा भुतडा, अमरावती महानगरपालिका आयुक्त श्री.प्रशांत रोडे, उपआयुक्त सुरेश पाटील, शहर अभियंता श्री. रविंद्र पवार आदी बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!