नांदगाव खंडेश्वर तालुक्यात व परिसरात आणि गावोगावी जाऊन वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय व हक्कासाठी लढा देताना गल्लोगल्ली फिरताना दिसतात शेतकऱ्यांच्या परिस्थिती ची जाणीव करून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तर्फे 14 नोव्हेंबर 2019 रोजी चांदूर रेल्वे येथे भव्य संत्रा परिषद आयोजित केलेली आहे.
त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नांदगाव खंडेश्वर तालुका सचिव प्रदीप थोरात व शहराध्यक्ष नासिर खान यांच्याशी आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधला त्यावर त्यांनी आमचा पक्ष शेतकऱ्यांच्या कडे फक्त मतदार म्हणून पाहत नाही शेतकरी भारताचा कना आहे त्यांना न्याय व त्यांचे हक्क मिळालेच पाहिजे यासाठी वंचित बहुजन आघाडी व त्यांचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर आणि निलेश भाऊ विश्वकर्मा हे सदैव प्रयत्नशील आणि वेळ प्रसंगी रस्त्यावर सुद्धा उतरणार व शेतकऱ्याच्या आणि पक्षाच्या कार्यासाठी सदैव तत्पर असतात अशी माहिती दिली