श्री हनुमान मंदिर देवस्थान संस्थान चाकण यांच्या वतीने काकडा आरती सोहळा

चाकण वार्ता प्रतिनिधी :- उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा l झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा l संत साधुमुनी अवघे झालेती गोळा l सोडा शेजसुख आता पाहू द्या मुखकमळा ll अशा काकड आरतीच्या अभंगातून चाकण नगरीत भक्तिमय मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.

श्री हनुमान मंदिर काकडा व्हिडिओ

संताची भूमी असलेल्या खेड तालुक्यातील चाकण गावांमध्ये हे सांस्कृतिक वैभव या काकड आरतीमधून आजवर टिकून आहे. भल्या पहाटे प्रत्येक गावात ज्येष्ठ मंडळी, महिला वर्ग व बालचमुसह काकडारतीला हजेरी लावून परंपरा जोपासत आहे

चाकण मधील नेहरु चौक येथे असलेले दक्षिणमुखी हनुमान मंदिर हे असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले हे देवस्थान मध्ये दरवर्षी परंपरेनुसार नेहरू चौक श्री हनुमान मंदिर देवस्थान संस्थान चाकण यांच्या वतीने
20/10/2021 ते 20/112021 असा महिनाभर काकडा आरती सोहळा सुरु आहे.व काकडा आरती सोहळा समाप्ती 21 नोव्हेंबर रोजी महाप्रसादचे आयोजन हनुमान मंदिर देवस्थान च्या वतीने करण्यात आले आहे.

काकडा आरती सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी रोज साधारण दोनशे भाविकांची उपस्थिती भल्या पहाटे मंदिरात असते. रोज भजन, कीर्तन सोहळा व महिला भगिनींची उपस्थिती सुद्धा आरतीचे, निरंजन लावून आणलेले ताट या सोहळ्याची शोभा वाढवतांना दिसत आहे. रोज असणारे पूजेचे मानकरी यांच्या वतीने भाविकांना चहा व नाष्टा याचे आयोजन केले जाते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!