दर्यापूरातील विविध समस्या बाबत मराठा सेवा संघाने केली सार्वजनिक बांधकाम विभागासोबत चर्चा

दर्यापूर – महेश बुंदे :-

येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयास जेष्ठ पत्रकार गजाननराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तालुका मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन शहरातील विविध समस्या संदर्भात सखोल चर्चा केली, दर्यापूर बस स्थानकाजवळीत बांधकाम विभागाच्या अधिकारातील वर्दळीच्या रस्त्यावर अनेक अपघात घडत असल्याचे निदर्शनास आणुन दिले व तिथे योग्य व्यवस्था करण्यात यावी.

तसेच अमरावती-अकोला मार्गे म्हैसांग रोड येथील दोन जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या पुर्णा नदीच्या पूलावरील स्वागत कमानद्वारावरील लोक महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव अत्यंत जिर्ण झाले आहे ते त्वरीत नव्याने सन्मानपूर्वक लिहण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच स्थानिक मराठा सेवा संघाच्या जागेवर सांचलेले पाणी व्यवस्थित रोडवरच्या नालीवर काढुन देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

त्यासोबतच शहरातील रहदारीच्या संदर्भात अधिकारी वर्गाचे लक्ष्य वेधण्यात आले,त्यावर कार्यकारी अभियंता श्री गिरी व संदीप देशमुख यांनी सुचविलेल्या समस्या वर त्वरीत उपाय योजना करण्यात येईल, असे आश्वासन दिले. चर्चेत शरद रोहणकर अध्यक्ष मराठा सेवा संघ, गजाननराव देशमुख कार्यकारीणी सदस्य मसेस, प्रविण पाटील कावरे, महेश भुतडा ईत्यादीनी चर्चेत भाग घेतला.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!