पुणे वार्ता:- मेदनकरवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडणूक अचानक रद्द झाल्याने ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांच्यामध्ये हमरी तुमरी पाहायला मिळाली. ग्रामपंचायत सरपंच यांनी सकाळी PMRDA च्या निवडणुकीत मतदान केले.परंतु ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीला अनुपस्थितीत राहिल्याने निवडणूक रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
परंतु ग्रामपंचायत सदस्यांनी या गोष्टीवर आक्षेप घेत दुसरा अधिकारी का नेमणूक केली नाही यावर ग्रामसेवक यांच्यासोबत हमरी तुमरी झाली.