खाजगी बसवाल्यांनी भाड्यात वाढ केल्याने प्रवाशांची होत असलेली लूट थांबवावी-फुलचंद भगत

प्रतिनिधी फुलचंद भगत:-

मंगरुळपीर:-सध्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून खाजगी बस सेवामध्ये मोठ्या प्रमाणात भाड्यात वाढ करून प्रवाशांची लूट करण्याचा प्रकार सुरू असून हा प्रकार थांबवण्यासाठी महाराष्ट्र सरकार व आरटीओ विभाग परिवहन विभाग काय करतात?ही प्रवाशांची लुट थांबवण्यासाठी काय पावले ऊचलनार आहेत?असा सवाल सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी करून सर्वसामान्यांची लूट करण्याची ची परवाना राज्य सरकारने दिला का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.


अनेक लोक पुणे,मुंबई तसेच इतर मेट्रोसिटीमध्ये नोकरी आणी कामानिमित्य गेले आहेत.लेकीबाळी, मातृशक्तीही आपल्या माहेरी गेले आहेत. भाऊबीज निमित्त त्यांना परती साठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे असे एकंदरीत चिञ आहे. शासन खाजगीकरण करण्याच्या दृष्टीने पावले उचलत आहे असे चिञ आहे. मोठ्या कंपन्या उभारून खाजगी बस मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक नेत्यांनी केल्याचा संशय सर्वसामान्य नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे.

खाजगी बसवर भाडेवाढीवर अंकुश ठेवण्याची गरज आहे. सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार राज्य शासन करत असून स्वतः एसटी कामगार नेते असताना अनिल परब एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेत नाही ही दुर्देवी बाब आहे असे सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी म्हटले आहे.खाजगी वाहनधारक प्रवाशांची करत असलेल्या लुटीबाबत आरटीओ परिवहन विभागाने लक्ष देऊन सर्वसामान्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!