Post Views: 640
वृत्तसंकलण स्वराज वार्ता (सुभाष कोटेचा)
चांदुर रेल्वे_ राज्य निवडणुक आयोगाचा मतदार नोंदणी हा कार्यक्रम वेगात असताना मनपा व नगरपलिकेचा कार्यक्रमा बाबत कुठलीच घोषणा नाही त्यामुळे ही निवडणुक केव्हा होणार हे निश्चित च नसले तरी जिल्हात बहुंताश नगरपालिका पाच वषाचा कार्यकाळ माहे डीसेबर मधे संपुष्टात येत असल्याने नगर सेवक होण्यासाढी इच्छुक नेते वार्डावाडातील जनतेच्या भेटीगाठी वाढवित असताना दिसत आहे.दिवाळीची आतषबाजी झाल्यानंतर राजकीय फटाके फुटायला सुरूवात झाली .अनेक इच्छुक राजकीय नेते आता फटाकेबाजी करत स्वत:चा स्वार्थ साधण्यासाढी जनतेची दिशाभुल करायचा पुढे सरसावले आहे.
चांदुर रेल्वे नगरपालिका श्रेञातील शहरात मागील पंचवार्षिक कांग्रेस नगरसेवराची संख्या होती कांग्रेस १०भाजपा ५,अपक्ष २ नगरसेवक प्रतिनिधि करीत आहे नगरसेवकाच्या संख्या वाढ होणार आहे.कारण शासऩाने नुकताच निर्णय घेत लोकसंख्येत आधारावर सदस्यसंख्या वाढविण्याचा निश्चित घैतला आहे त्यामुळे २ प्रभाग वाढ होऊन ४ सदस्यासंख्या नव्याने वाढु सकते .एकंदरित नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानै इच्छुक उमेदवार वार्डावार्डातील नागरिकांच्या भेटीगाठी घैण्यासोबत मी नियमित कामासाठी तत्पर राहील .या भुमिकेतुन वावरताना दिसत आहे.तर इच्छुक राजकीय स्वार्थ साठी आराेप प्रत्यारोप करत असताना नागरिकाचे मनोरंजन होत आहे