दर्यापूर – महेश बुंदे
राज्य परिवहन मंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी मागील ३ दिवसांपासून सुरु असलेला संप संपता संपत नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. दर्यापूर आगारातील एसटी सेवा ठप्प झाल्याने प्रवासाचे साधन म्हणून प्रवाशांना खाजगी वाहतूकीचा पर्याय निवडावा लागला आहे. खाजगी वाहतूकदारांनी दर्यापूरच्या मध्यमर्वी बसस्थानकाला गराडाच घातला आहे.

बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावच खाजगी वाहतूकीची वाहने रांगेत उभे राहून प्रवाशी घेत आहेत. एसटीची चाके गेल्या ३ दिवसांपासून जागेवर थांबुन आहेत. ऐरवी गजबजलेल्या बसस्थानकात शुकशुकाट आहे. एकही बस बाहेरुन येत नाही की, दर्यापूरनही बस सोडली जात नाही. प्रवासी आपापल्या कामाधंद्याच्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले आहेत. परंतू, एसटी सेवा ठप्प असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. ज्यांच्याकडे वाहनांची सुविधा आहे ते आपापल्या वाहनाने ये-जा करीत आहेत. परंतू ज्यांच्याकडे वाहनाची व्यवस्था नाही, त्यांना खाजगी प्रवासी वाहतूक करणा-या वाहनांतून जाण्याशिवाय पर्याय नाही. मात्र खिशाला चाट बसत आहे. दर्यापूर आगाराचे दैनंदिन उत्पन्न ४ लाख आहे. मात्र गेल्या ३ दिवसांपासून सुरु असलेल्या संपामुळे एस. टी. चे हे उत्पन्न बुडाले आहे. सुरु असलेल्या संपामुळे एसटीचे मोठे नुकसान होत आहे. आगारातील कर्मचारी संपावर असल्याने एसटी सेवा पुर्णत: ठप्प आहे, असे आगार व्यवस्थापक पवन लाजुरकर यांनी सांगीेतले.
पोलिसांचे प्रवाशांना आवाहन