“इकडे लक्ष द्या बे पोटेहो”,अबे डोमळ्या कवा सुधरशीन तू”, अशा आपल्या ग्रामीण बोलीभाषेमुळे अल्पावधितच कोरोना काळात सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेले विदर्भाचे सुपुत्र वर्धा येथील रहिवासी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे “कराळे मास्टर” दि. १४ नोव्हेंबर रोजी दर्यापूर येथे येत आहेत.
कराळे सर
दर्यापूर शहरातील शेतकरी सदन येथे सकाळी ११ वाजता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ येथील सूर्योदय सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलाआहे. कोरोना काळात सर्व स्पर्धा परीक्षा क्लासेस बंद असल्याने वर्धा येथील फिनिक्स अकादमीचे संचालक प्रा. नितेश बाळकृष्ण कराळे सर यांनी ऑनलाइन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुरू केले आणि आपल्या वैदर्भीय बोलीभाषेतून ते मार्गदर्शन करत असल्याने व अस्सल ग्रामीण शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असल्याने ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाले आहे,.
त्यामुळे त्यांचे दर्यापूर शहरात प्रथम आगमन होत असल्याने या संधीचा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी व पालकांनी आणि दर्यापूरकर नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन सूर्योदय सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.आशिष शिवाजीराव देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.