आमदाराने अपशब्द वापरल्यामुळे मंगरुळपीरच्या ग्रामसेवकांनी निषेध नोंदवत पुकारले कामबंद आंदोलन

प्रतिनिधी फुलचंद भगत:-


वाशिम:-आमदार संजय सिरसाट यांनी ग्रामसेवकांबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल मंगरूळपीर तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांनी एकञ येवुन या घटनेचा तिव्र निषेध नोंदवला व एकदिवशीय धरणे आंदोलन करुन कामबंद आंदोलन केले.


दि.८ आॅक्टोबर रोजी औरंगाबाद येथे महिला सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमामध्ये औरंगाबादचे आमदार संजय सिरसाट आपला तोल सोडुन भाषण केले.या भाषणामध्ये ग्रामसेवकांबद्दल अर्वाच्च भाषा वापरुन शिविगाळ केली व ग्रामसेवक भामटे आहेत,महिला सरपंचाची फसवणुक करतात अशी अर्वांच्या भाषा वापरल्यामुळे त्यांना भानावर आणने गरजेचे आहे.

या निरर्थक वक्तव्यामुळे २२हजार ग्रामसेवकांच्या भावना तिव्र झाल्या आहेत.राज्यभर ग्रामसेवक अतिशय प्रतिकुल परिस्थीतीत प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असतात.श्री.सिरसाट यांनी आपल्या बेजबाबदार वक्तव्याबद्दल माफी मागावी व आपले म्हणने मागे घ्यावे.या वक्तव्यामुळे ग्रामसेवकांबद्दल समाजामध्ये चुकीचा संदेश गेला आहे.या निषेधार्थ राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांनी काळ्या फिती लावुन निषेध व्यक्त करीत आहेत.

ग्रामसेवक संवर्ग खुप तणावाखाली आहे.प्रचंड मानहानी झालेली आहे.सरपंच व ग्रामसेवकांमध्ये तेढ निर्माण झालेली असुनअविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे.अशा प्रवृत्तीचा बिमोड करन्यासाठी वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील ग्रामसेवकांनी काळ्या फीती लावून निषेध नोंदवत एकदिवशीय धरणे आंदोलन केले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!