ठाणे येथील विद्याताई पडवळ करणार वाचन
प्रतिनिधी महेश बुंदे दर्यापूर:-
येथील श्री संत गजानन महाराज भक्त मंडळ याच्या वतीने गेल्या चार वर्षापासून श्री गजानन महाराज विजयग्रंथ महापरायनाचे आयोजन करण्यात येत आहे.
मागील वर्षी कोरोना काळातही छोट्या स्वरूपाचे हे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा पारायणाचे आयोजन येत्या रविवारी दि १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता पासून शहरातील प्रसाद मंगलम, अमरावती रोड येथे करण्यात आले आहे.

या विजयग्रंथ महापारायण मध्ये सहभागी होण्याकरिता शहरातील युवासंवाद नोकरी मार्गदर्शन केंद्र सांगळुदकर नगर, साई हॉस्पिटल खरेदी विक्री जवळ, श्री गजानन इलेक्ट्रॉनिक बनोसा, जगदंब मेडिकल कास्तकार नगर, सहयोग कॉलनी, परिधान मॅचिंग सेंटर, सांगळुदकर कॉम्प्लेक्स, जय गजानन मेडिकल डॉ पंजाबराव देशमुख कॉलनी येथे आपण नाव नोंदवून घ्यावे.
अधिक माहितीकरिता मो.7350026035/ मो.98 60157333 मो.8275419158/ मो.97 65 33 74 44/ मो.98 50 590 55 3/ मो.9158111181/मो.9423648927/ मो. 982288 0483/मो.9881574125 असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.