प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या कमिटीच्या विश्वस्त पदावर पुन्हा एकदा अँड राजेंद्र उमाप यांची फेरनिवड करण्यात आल्याची माहिती देवस्थान कडून देण्यात आली आहे.विश्वस्त हे पुण्यातील प्रख्यात विधितज्ज्ञ असुन महाराष्ट्र आणि गोवा बार कन्सिलचे अध्यक्ष आहेत. तर अष्टविनायक असलेल्या मोरगाव, थेऊर, सिद्धटेक या तीर्थक्षेत्रांच्या देवस्थानचे विद्यमान विश्वस्त आहेत.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान कमिटीची बैठक पुणे येथे 1 ऑगस्ट 2024 रोजी संपन्न झाली. या बैठकीत 2024 ते 2025 या वर्षासाठी अँड राजेंद्र उमाप यांची संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान कमिटीच्या विश्वस्त पदावर सर्वानुमते पुन्हा निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.यावेळी योगी निरंजनाथ, गुरू शांतिनाथ विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख व डॉक्टर भावार्थ देखणे हे यावेळी उपस्थित होते..