प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार व या दिवशी अमावस्या आल्याने सोमवती अमावस्या असा दुहेरी योग आज सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी पहायला मिळाला. असा शुभ योग आल्याने खेड तालुक्यातील प्रतिखंडोबा असलेले निमगाव व खरपुडी येथील मल्हार गडावर भाविक भक्तांची मोठी गर्दीने फुलून गेलेले पाहायला मिळाले.तर तालुक्याच्या कानाकोपऱ्यातुन अनेक भक्त खंडोबा देवाचा दर्शनासाठी आले होते. तर काही जण गोंधळ भराडाचा कार्यक्रम करण्यासाठी गडावर आलेले दिसून आले. त्यामुळे दोन्ही ठिकाणी सदानंदाचा येळकोट जयगोशाने मल्हार गड दुमदुमून निघाला.
गडावर जिकडे तिकडे भाविक भंडाऱ्याची उधळण केल्याने मंदिर परिसर सोन्याच्या रंगाने न्हाऊन निघाला होता.सकाळ पासुन निमगाव ,व खरपुडी येथील मंदिरात येथे खंडेरायाचे अनेक भाविकांनी दर्शन घेतले. एकूणच सोमवती अमावस्या व शेवटचा सोमवारी निमगाव,खरपुडी येथील मल्हार गड भाविकांच्या गर्दीने दुमदुमून निघाला.