प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- खेड तालुक्यात काल पासून पडत असलेल्या तुफान पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पुर आला आहे. तसेच तालुक्यातील तिन्ही धरणातून नदी पात्रात विसर्ग सोडण्यात आला असुन नद्यां दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. आज देखील सकाळ पासुन पडत असलेल्या तुफान पावसामुळे काळूस येथील नदीला मोठा पूर आल्याने गावाकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे.
काळूस येथील पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक पूर्णपने बंद झाली आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिकांना चाकण मार्गे काळूस गावात यावे लागत असल्याने मोठा त्रासाला सामोरे जावे लागत आहे.