प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे:- येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून ठाकरे की पवार गटाचा यांचा उमेदवार उभा राहणार, यामुळे खेड तालुक्यातील नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी शिवेसना ठाकरे गटाचे संजय राऊत दौऱ्यावर असताना त्यांनी इकडची दुनिया तिकडे होईल पण खेडचा पुढचा आमदार हा शिवसेनेचा होईल.असे छाती ठोकपणे भरसभेत सांगितले होते.यामुळे उद्धव ठाकरे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.व खेडची विधानसभा उमेदवारी शिवसेना ठाकरे गटाला मिळणार असा अंदाज जनतेपुढे निर्माण झाला होता.
खेड तालुक्यातील विधासनसभा मतदान संघात महाविकास आघाडीचे, व सध्या सरकारमध्ये असलेल्या महायुतीचे इच्छुक उमेदवार जोरदार तयारीला लागले आहेत. अनेकांनी आपल्या मतदारांना खुश करण्यासाठी आतापासूनच तयारी चालूं केली आहे. महाविकास आघाडीच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून अतुलभाऊ देशमुख, रामदास ठाकूर, सुधीर मुंगसे,हे उमेदवार इच्छुक आहेत, तर उद्धव ठाकरे गटाकडून बाबाजी काळे व अमोल पवार इच्छुक आहेत.
तसेच महायुतीचे उमेदवार अजित पवार गटाकडून दिलीप मोहिते, व शिंदे गटाकडून अक्षय जाधव हे इच्छुक आहेत.येणाऱ्या निवडणुकीत विद्यमान आमदार असलेल्या अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पराभव करण्याचा सर्व महाविकास आघाडीच्या इच्छुक उमेदवारांनी चंग बांधला असुन त्याची तयारी चालूं केली आहे. परंतु आगामी काळात महाविकास आघाडीतील जनसमुदायामध्ये असलेले ठाकरे गटाचे, बाबाजी काळे,अमोल पवार व पवार गटाचे अतुलभाऊ देशमुख,सुधीर मुंगसे यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे खेड तालुक्यातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.त्यामुळे ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या संजय राऊत यांनी दिलेला शब्द खरा ठरणार की,पवार गटाची पॉवर चालणार हे काही महिन्यात जनतेला कळेल….