स्वराज्य वार्ता विशेष प्रतिनिधी
पुणे :- काल चाकण मधील बाजार पेठेत एक व्यक्ती भारतीय राष्ट्रध्वजाने आपली चिखलाने भरलेली स्प्लेंडर गाडी पुसत असल्याचा नागरिकांना आढळला. चाकण मधील जागृक असलेल्या हिंदू संस्कार फौंडेशनच्या हा प्रकार पहिला असता तळपायाची आग मस्तकात गेली,.परंतु आधी कायद्याची जाणीव त्यांना झाल्याने त्यांनी सदर इसमाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असुन त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर इसम जाकीर शफीक शाह चाकण बाजार पेठेतील इटालियन बेकरी येथे कामाला आहे. तो गावोगावी बेकरीचे पदार्थ विक्री करतो. तो काल त्याची चिखलाने माखलेली दुचाकी स्प्लेंडर गाडी MH 12 EJ 3988 आपल्या राष्ट्रध्वजाने साफ करत असताना चाकण मधील सामाजिक कार्यकर्ते अजय जगनाडे यांनी पाहिले. त्यांनी थांबून चौकशी केली असता त्याने गाडीची घाण साफ करण्यासाठी आपला तिरंगा ध्वज वापर केल्याची कबुली दिली. यावर ज्या देशात राहून त्या देशाचा राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्या त्या इसमाला पोलिसांच्या ताब्यात दिले.त्यावर चाकण पोलिसात राष्ट्र गौरव अपमान अधिनियम 1971 कलम 2 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याला चाकण पोलिसांनी अटक केली असुन लवकर न्यायालयात हजर केले जाणार आहे. परंतु या घटनेची चाकण मधील नागरिकांनी संताप व्यक्त केला असुन अशा प्रवृक्तींना ठेचून काढल्याशिवाय पर्याय नाही, अन्यथा न्यायालयाने कठोर शिक्षा अशा व्यक्तींना करण्याची मागणी केली आहे.