प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा झाली, व सर्व महिला भगिनींना महिन्याला 1500 हजार रुपये या योजनेच्या माध्यमातून देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे, व ऑनलाइन फॉर्म भरण्याचे शासनाने विविध स्तरावर,सांगितले असुन राज्यातील अनेक महिलांनी आपले फॉर्म जमा केले आहेत. चाकण मधील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक अक्षय जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात आलेल्या महिलांना मोफत फॉर्म भरून दिले जात असून जनसेवा केली जात आहेत.या उपक्रमाला जनसंपर्क कार्यालयात महिलांचा मोठा प्रतिसाद भेटत आहे. त्यामूळे कार्यालय महिला भगिनींमुळे गर्दीने फुलून गेले आहे.
राज्यात लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने महिलांना 31 ऑगस्ट 2024 पर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन केले आहे.योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना महिन्याला 1500 हजार रुपये खात्यामध्ये मिळणार आहे. त्यामुळे नागरी सुविधा केंद्रावर,व शासकीय कार्यालयांमध्ये महिलांची मोठी झुंबड उडालेली पाहायला मिळाली.
मात्र, चाकण मधील जनसेवक व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक अक्षय जाधव यांनी सर्व सुविधा आपल्या जनसंपर्क कार्यालयात मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. आज अखेर 1350 महिलांनी फॉर्म जमा केले असुन त्यांनी अंदाजे 1000पेक्षा जास्त महिलांचे फॉर्म ऑनलाइन जमा केले आहे. लवकरच त्यांच्या खात्यावर पहिला हप्ता जमा होणार आहे.