प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- चाकण जवळील रासे गावातील डोंगरावर असलेल्या श्री रेणुका देवी मातेच्या भंडारा येत्या मंगळवारी आयोजन करण्यात आले आहे.नवसाला पावणाऱ्या या देवीच्या दरवर्षी प्रमाणे भंडारा संपन्न होणार असुन ग्रामस्थांनी व भाविकांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. असे देवस्थान कडून आवाहन करण्यात आले आहे.
साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या माहुरगडची श्री रेणुका देवीचे सारखे रूप व सुबक मूर्ती खेड तालुक्यातील रासे गावातील डोंगरावर रेणुका देवीच्या मंदिरात विराजमान आहे.अत्यंत सुबक काळया पाषाणातील देवीची मुर्ती या ठिकाणी पाहायला मिळते. दरवर्षी या मंदिरात अनेक भाविक दर्शनासाठी व बोललेला नवस फेडण्यासाठी येत असतात.खेड तालुक्यात एकमेव असलेले श्री रेणुका मातेचे मंदिर असुन अनेक भाविक आषाढ महिन्यात व नवरात्रीला या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.
नवरात्रीमध्ये देवीचा नऊ दिवस मोठा जागर केला जातो. अत्यंत आनंदाने यावेळी नऊ दिवस देवीचे कार्यक्रम पार पडतात.येत्या मंगळवारी श्री रेणुका मातेच्या देवीचा भंडारा आयोजन केले असे असून खेड तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे कळविण्यात आले आहे.