प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याचे महसूल विभागाचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्यावर शासनाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आले आहे.सर्वसामान्य नागरिकांना, वकिलांना व कोविड काळात नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला असुन ते प्रकरण त्यांना आता भोवले आहे.
खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कटारे यांची 28 जून रोजी निलंबन करण्यात आले होते. ते प्रकरण ताजे असताना आता त्यानंतर फक्त 13 दिवसात खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांचे निलंबन करण्यात आले आहे. प्रशांत बेडसे यांच्या निलंबनामुळे नागरिकांमध्ये, वकिलांमध्ये समाजाचे वातावरण आहे.खेड वकील बार संघटनेच्या वतीने तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या निलंबनाच्या आदेशानंतर तहसीलदार कार्यालय परिसरात फटाके वाजवून आनंद साजरा केला.सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ या ठिकाणी पदावर असताना तहसीलदार प्रशांत बेडसे कोविड 19 च्या नियमाचे उल्लंघन करणे, सर्वसामान्य नागरिकांना अपमानास्पद, वागणूक देणे वकिलांना अपमानास्पद वागणूक देणे आदी बेडसे यांच्या विरोधात शासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारी गंभीर स्वरूपाचे असल्याने व शासनाचे प्रतिमा मलिन झाल्याने त्यांचे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.शासनाने अहवाल प्राप्त करून 10 दिवसात निलंबनाचे आदेश काढले आहेत. तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1969 मध्ये नियम 8 अन्वये विभागीय चौकशीचे निगमित करण्यात आले असून विभागीय चौकशी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान त्यांचे निलंबन ते पुर्वी असलेल्या सोलापूर जिल्हातील मोहोळ या ठिकाणी कामकाजात कसूर केल्याने व सर्वसामान्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने यामुळे निलंबन केले आहेत. यावेळी खेड बार असोसिएशनचे वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते