प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- चाकण जवळील नाणेकरवाडी गावातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.गावातील भाजप पक्षाचे तालुका कामगार मोर्चा संयोजक श्री बाळासाहेब नाणेकर यांनी मोफत या शिबीराचे आयोजन केले होते. या शिबिराला गावातील महिलांनी, भाडेकरू मुलींनी मोठा प्रतिसाद दिला असुन लाडकी बहीण योजनेची कागदपत्रे जमा केली आहेत.
नाणेकरवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आज हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे मोफत शिबीर भरविण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालून या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर शिबिराला आलेल्या महिलांचे कागदपत्रे गोळा करून त्यांचे फॉर्म जमा करण्यात आले.आज शिबिराला एकूण अंदाजे 400 महिलांनी उपस्थिती लावली व आपले फॉर्म जमा करून दिले.त्यांची कागदपत्रे online जमा केल्यानंतर त्यांना लवरकच या योजनेचा 1500 रुपये लाभ हा त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
खेड तालुक्यातील गावांतील प्रत्येक ग्रामपंचायतीने असे शिबीर भरवून गावातील सर्व महिलांना या योजनेचे Form भरून देण्यासाठी अशा शिबीराचे गावांमध्ये आयोजन केले तर पात्र सर्व महिलांना या योजनेचे लाभ मिळेल असे यावेळी बाळासाहेब नाणेकर यांनी बोलताना सांगितले.