प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणें:-रासे गावातील आदिवासी शाळेला पुष्पाई फौंडेशन मेदनकरवाडी यांच्याकडून रेनकोट व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. गावातील आदिवासी शाळेतील गरीब विध्यार्थ्यांना याचा मोठा उपयोग होणार आहे.
शाळेय साहित्य व रेनकोट मिळाल्याने विध्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. विविध रंगाचे रेनकोट घातल्याने विध्यार्थी चमकून दिसत होते.एक हसरा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
यावेळी पुष्पाई फौंडेशनच्या अध्यक्षा सौ पुष्पाई शिंदे, उपाध्यक्ष काळुराम शिंदे,प्राचार्य सरिता शिंदे,श्री रामकृष्ण शिंदे व पालक, शिक्षक यावेळी उपस्थित होते.