प्रतिनीधी कुणाल शिंदे
पुणे:- आषाढी वारीसाठी राज्यभरातून दिंडी सोबत वारकरी विठू माऊलींच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात. काही वारकरी हे पायी तर काहीजण आपल्या खाजगी वाहनाने पंढरपुरला जातात. अशा पंढरपुरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर्षी देखील टोलमाफी देण्याची घोषणा केली आहे.आजपासून याची अंमलबजावणी केली असुन पंढरपूरकडे येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी देण्यात आली आहे.
ऊन, पाऊस, वाऱ्यासह निसर्गाच्या विविध संकटांचा सामना करत वारकरी पंढरीकडे पाऊलं टाकत आहेत. तसेच एसटी महामंडळानेही हजारो बस पंढरीच्या वारीसाठी सोडल्या आहेत. याशिवाय खासगी वाहनांचीही मोठी संख्या पंढरपूरकडे ये-जा करत असते. वारीच्या कालावधीत पंढरीत लाखो वैष्णवांचा मेळा जमतो. कार, बससह विविध वाहनांतून वारकरी, भाविक भक्त मोठ्या संख्येने चंद्रभागेच्या तिरी जमतात. या भाविकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यंदाही आषाढी वारीसाठी येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी देण्यात आली आहे. आजपासून 21 जुलैपर्यंत ही टोलमाफी असणार आहे.