प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- खेड तालुक्यातील 12 वाड्याचे गाव असलेले काळुस गावातील स्मार्ट सखी फाउंडेशन व जिजामाता ग्रामसंघ यांच्याकडून वडाचे झाडांचे वाटप करण्यात आले.त्यामध्ये गावातील असलेले नवचैतन्य उच्च माध्यमिक विद्यालयाला झाडांची रोपे वाटप करण्यात आली.
वृक्षतोडीचे प्रमाण वाढल्याने तापमानात मोठी वाढ होत आहे. याचा परिणाम सर्व प्राणी मात्रांवर होत आहे. जिकडे तिकडे सिमेंटचे जंगल वाढत असताना वृक्षच आधार ठरणार ठरतील. याची सुरवात शालेय जीवनापासून होणे गरजेचे आहे.माध्यमिक विद्यालयात आलेल्या महिलांनी पर्यावरण संरक्षणाचा संदेश देऊन आता पावसाळ्यात सर्वांनी एक तरी झाडे लावण्याचे यावेळी बोलताना विध्यार्थ्यांना सांगितले.
यावेळी नवचैतन्य महाविद्यालयाच्या प्राध्यापक नरके मॅडम, महिला बचत गटाच्या मंजुषा पवळे व महिला उपस्थित होत्या.