प्रतिनिधी कुमार नाईकनवरे
पुणे :- खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याच्या वाहनाने दोन जणांना चिरडले असल्याची घटना 2 दिवसांपूर्वी मध्यरात्री पुणे नाशिक महामार्गावर कळंब या गावाजवळ घडली. या अपघातात एक तरुण ठार व एक गंभीर जखमी झाला होता.
आमदार दिलीप मोहिते यांचे पुतणे मयूर मोहिते यांच्यावर त्या दिवशी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानंतर आरोपींला न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. आरोपीला पोलिसांनी न्यायालयानत हजर केले असता आरोपींच्या वकिलांनी सादर केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे अजून आमदार पुतण्याच्या अडचणी वाढल्या आहेत…