प्रतिनिधी प्रितम शिंदे
पुणे :- चाकण शहरातील एक अभ्यासु नेतृत्व व लोकनेते श्री किरण वसंत मांजरे वय ६५ वर्ष यांचे आज पहाटे आकस्मित निधन झाले. आज पहाटे त्यांनी या जगाचा निरोप घेतला.त्यांच्या अंत्यदर्शनासाठी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी चक्रेश्वर येथे गर्दी केली होती. चाकणच्या राजकारणातील एक अभ्यासू नेता हरपल्याची खंत नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
चाकणच्या समाज कार्यामध्ये स्वतःला वाहून नेणारे किरण वसंतराव मांजरे यांनी तालुक्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचे वडील माजी आमदार वसंतराव मांजरे यांच्या घरातील सामाजिक कार्याची परंपरा पुढे चालु ठेऊन त्यांनी अनेक पदे भूषवली होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत जिल्हा परिषद सदस्य, राजगुरूनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष,दूध विकास संस्थेचे चेअरमन या पदांवर त्यांनी काम केले. त्यामुळे तालुक्यातील व चाकणच्या राजकारणात एक वेगळी निर्माण त्यांनी केली होती.
त्यांच्या पाठीमागे भाऊ, भावजय, पत्नी, मुलगा, सून , मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. या चाकण शहरातील अभ्यासू व्यक्ती महत्वाला स्वराज्य वार्ता चॅनेलची भावपुर्ण श्रद्धांजली……