प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- शिरूर लोकसभा मतदार संघाच्या 2024 ते 2029 या लोकसभेच्या जागेवर झालेल्या निवडणुकीचा निकाल आज अखेर जाहीर झाला. या निकालामध्ये शरद पवार गटाचे डॉ.अमोल कोल्हे हे विजयी होणार हा अंदाज स्वराज वार्ता चॅनेलंच्या प्रतिनीधिनी बोलताना व्यक्त केला होता. त्यासाठी त्यांनी जनतेतून अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या होत्या.आज अखेर हा अंदाज खरा ठरला असुन शिरूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे हे १,५४,००० हजार मतांनी विजयी झाले आहे.त्यांच्या पक्षाची तुतारी ही पुन्हा शिरूर मतदार संघात वाजली आहे.

शिरूर लोकसभा मतदार संघात डॉ अमोल कोल्हे व शिवाजी आढळराव पाटील हे दिग्गज उमेदवार रिंगणात उभे होते. डॉ अमोल कोल्हे गेल्या 2019 च्या निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आले होते.परंतु राज्यात झालेल्या पक्ष फोडीच्या राजकारणामुळे 2024 या लोकसभेच्या निवडणुकीत देखील त्यांनी शरद पवार गटाच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवण्याचे आपला उमेदवारी अर्ज पुन्हा दाखल केला होता. एकीकडे शिंदे गटात असलेले माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील तो पक्ष सोडून अजित पवार गटात प्रवेश करून घड्याळ या चिन्हावर उभे राहिले होते. या दोन्ही दिग्गज उमेदवारांच्या जोरदार प्रचारासाठी अनेक बड्या नेत्यांनी सभा घेऊन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते.त्यामुळे शिरूर मतदार संघात प्रचार जोरात गाजला होता.

या 36 नंबरच्या मतदार संघात 13 मार्च 2024 रोजी मतदान होऊन त्यांच्यासोबत उभ्या असलेल्या 30 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले होते. या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होऊन डॉ अमोल कोल्हे हे पुन्हा दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्याने शिरूर मतदार संघात तुतारी वाजली आहे..