प्रतिनिधी कुमार नाईकनवरे
पुणे :- खेड तालुक्यातील अनेक गरीब कुटुंबातील मुला मुलींची लग्ने पार पाडण्यासाठी स्व आमदार सुरेश गोरे प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून मोफत सामुदायिक विवाह सोहळा काल चाकण येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.यावेळी तालुक्यातील नागरिकांनी, व बड्या राजकीय नेत्यांनी हजेरी लावलेली पहायला मिळाली.

चाकण येथील मार्केटमध्ये हा सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या आनंदाने पार पडला. लग्न कार्यात केले जाणारे सर्व विधी यावेळी या ठिकाणी केले जाऊन नवंदांपत्यांना सर्वांनी भरभतून आशीर्वाद दिले आहे. यावेळी 5 जोडप्याचा विवाह सोहळा संपन्न झाला.व स्व आमदार सुरेश गोरे प्रतिष्ठान यांच्या प्रयत्नातून गरीब कुटूंबातील आई वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

या स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठान आयोजित सामुदाईक विवाह सोहळ्यास अनेक मान्यवरानी उपस्थिती लावली. माजी खासदार आढळराव पाटील, लोकनेते अशोकराव खान्डेभराड, नितीनशेठ गोरे पाटील यांनी नव वधू वरांना शुभ आशीर्वाद दिले.व अनेक वऱ्हाडी मंडळींनी उपस्थिती यावेळी लावली होती.