प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- चाकण शहराची होणारी भैरवनाथ महारांजांची यात्रा ट्रस्टच्या वादामुळे यावर्षीचे यात्रेचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ महाराजांच्या यात्रा कमिटी व ट्रस्टच्या वादामुळे फक्त हारतुरे, देवाची पुजाअर्चा व कीर्तन घेण्याचा कार्यक्रम घेण्याचा अखेर चाकण पोलिसांनी सांगितले आहे.

खेड तालुक्यातील सर्व गावांची यात्रा संपन्न झाल्यावर अखेर शेवटी चाकण येथील ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ महाराजांची यात्रा मोठ्या थाटामाटात पार पडते, ग्रामस्थांची बैठक होऊन सदर यात्रेचे नियोजन गठीत केलेल्या यात्रा कमिटीकडून केली जाते.व यात्रेमध्ये भैरवनाथ महाराजांची पालखी मिरवणूक, बैलगाडा शर्यत, व मनोरंजन कार्यक्रम तमाशा, ऑर्केस्ट्रा भरविले जातात. परंतु यावर्षी यात्रा कमिटीने कोणालाही विश्वासात न घेता खोट्या सह्या व कागदपत्रांच्या आधारे भैरवनाथ देवस्थान ट्रस्टची स्थापना केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे,

त्यामुळे काही ग्रामस्थांनी यात्रेला परवानगी न देण्याचे पत्र चाकण पोलीस स्टेशनला दिले. व अखेर चाकण पोलिसांनी दोन्ही आरोप प्रत्यारोप करणाऱ्यामुळे चाकण भैरवनाथ महाराजांची यात्रेमधील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बाकीचे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेऊन ग्रामदैवताचे कार्यक्रम करण्याचे सांगितले आहे.त्यामुळे भैरवनाथ महाराजांच्या मंदिरात कीर्तनाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला चाकण मधील नागरिक मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत.
