प्रतिनिधी कुणाल शिंदे
मुंबई :- पुणे जिल्ह्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे प्रबळ दावेदार अक्षय जाधव व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मध्यरात्री उशिरा पर्यंत खलबत झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
अक्षय जाधव यांना मुंबईतुन बोलावणे आल्याने मतदारसंघात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री यांनी अक्षय जाधव तुम्ही निश्चिन्त रहा तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही असा थेट शब्द दिल्याने शिंदे साहेब नक्की काय डाव टाकतात हेचं पहावे लागेल. अक्षय जाधव यांना नक्की कोणता शब्द दिला या बाबत कोणतीही सविस्तर चर्चा बाहेर आली नाही पण शब्द दिला हे नक्की. यावरून खेड-आळंदी विधानसभेची राजकीय समीकरणे कशी बदलता हेच पहावे लागेल.