प्रतिनिधी प्रितम शिंदे
पुणे :- महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ चाकण मार्केट यार्ड येथे झालेल्या सभेमध्ये शिवसेना (उबाठा) सहकार सेना जिल्हा प्रमुख शंकर दाते यांचा विधान परिषदेचे आमदार भाजपा नेते प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश झाला.

भाजपा जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा सेवा प्रकोष्ठचे जिल्हा संयोजक तथा भाजपा तालुका कार्याध्यक्ष ॲड. प्रितम शिंदे पाटील यांच्या प्रयत्नातून सदर प्रवेश करण्यात आला.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य राम गावडे, जिल्हा सरचिटणीस संजय रौंधळ, भाजपा नेते राजन परदेशी, भाजपा नेते कालीदास वाडेकर, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. गणेश सांडभोर, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता खांडेभराड, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा प्रिया पवार आदींसह भाजपा प्रदेश, जिल्हा, तालुका, शहर पदाधिकारी उपस्थित होते.