चाकण पंचक्रोशीतील गावांमध्ये शांततेत मतदान, अनेक ठिकाणी ५० ते ६०% मतदान… टक्केवारी घसरली

पुणे:-देशाच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी लोकसभा निवडणूक आज चौथ्या टप्प्यात पार पडली.चाकण पंचक्रोशीतील गावांमध्ये दिवसभर शांततेत मतदान झाल्याने पाहायला मिळाले. कुठेही अनुसूचित प्रकार घडून आला नाही. अनेक ठिकाणी गावांमध्ये ५० ते ६०% मतदान झाल्याने मतदारांनी पाठ फिरवल्याने टक्केवारी घसरली.

शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी आजी माजी खासदार उमेदवारांसोबत 30 नवे उमेदवार रिंगणात उभे होते.दिग्गज उमेदवारांनी अनेक प्रचार सभा, आरोप-प्रत्यारोप, व सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला प्रचार हा जोरदार केला होता.तसेच अपक्ष उभे असेलेले उमेदवार यांनी देखील प्रचारात कसूर केली नाही, अखेर आज शिरूर लोकसभा 36 नंबर मतदार संघातील चौथ्या टप्प्यातील निवडणूक आज पार पडली.

चाकण पंचक्रोशीतील गावांमध्ये अनेकांनी आपल्या जोरावर आपल्या लाडक्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी मोठी दिवसभर कसरत केली. सकाळी व संध्याकाळी मतदान केंद्रावर मतदारांनी मोठ्या रांगा लावलेल्या पाहायला मिळाल्या. तरी देखील काही कारणांमुळे व जनतेचा नेत्यांवरील विश्वास उडत चालल्याने टक्केवारी घसरली.अनेकांनी मतदान करायला पाठ फिरवली.चाकण पंचक्रोशीतील गावांमध्ये सरासरी ५० ते ६०% मतदान झाल्याचे पाहायला मिळाले.चाकण पंचक्रोशीतील गावांमध्ये एकुण मतदान व झालेले मतदान खालीलप्रमाणे….

रासे….
एकूण मतदान…..2649
झालेले मतदान…..1611

कडाचीवाडी…
एकूण मतदान…..1427…
झालेले मतदान…..859

नाणेकरवाडी….
एकूण मतदान…..3965…
झालेले मतदान…..2375

मेदनकरवाडी….
एकूण मतदान…..7216…
झालेले मतदान…..4302

भोसे…
एकूण मतदान…..3519…
झालेले मतदान…..2237

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!