प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे दरवर्षी आषाढी वारीसाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी करून ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात प्रस्थान ठेवले जाते.यावर्षी देखील संत ज्ञानेश्वर माऊलींचे पालखीचे येत्या २९ जुन रोजी आळंदी येथून प्रस्थान केले जाणार असल्याची माहिती ज्ञानेश्वर महाराज देवस्थान कडुन देण्यात आली आहे.

आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे अनेक वारकरी भगव्या पताका घेऊन, व दिंड्यासोबत पायी राज्याच्या कानाकोपऱ्यातुन येत असतात. अलंकापुरी नगरीतील संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी देखील लाखो वारकऱ्यांसोबत पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत असते.या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे विसावा, मुक्काम व परतीच्या प्रवासाचे वेळापत्रक देवस्थान कमिटी कडून जाहीर करण्यात आले असुन ते खालीलप्रमाणे…
