प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- देशात डिजिटल इंडिया क्रांती संकल्पनेचा मा पंतप्रधान नरेंद मोदी यांच्याकडून अनेक कार्यालयात,विविध ठिकाणी प्रसार केला जात असताना आता अनेक सरकारी शाळांमध्ये देखील त्याचा उपयोग केला जात आहे.रासे गावच्या बापदेव वस्तीवरील आदिवासी शाळाने देखील यामध्ये अनेक वर्षांनी डिजिटल होऊ लागली आहे. त्यामुळे आदिवासी मुलांना नवीन तंत्रज्ञान व शिक्षण हे आता डिजिटल रुपात प्राप्त होणार आहे.

रासे गावातील बापदेव वस्तीवरील आदिवासी शाळेच्या मुलांना आता डिजिटल पध्दतीने शिक्षण घेता येणार आहे.मुंबई माता बाल संगोपन केंद्र-शाखा खेड व समकॉन्सेप्ट टेक्नॉलॉजी पुणे यांच्या सौजन्याने स्मार्ट एलईडी टीव्ही प्राप्त झाला असून त्यावर आता आदिवासी मुलांना डिजिटल शिक्षण मिळणार आहे. शाळेतील मुलांना शिक्षणाचे धडे देणारे श्री संजय भोसले व सौ छाया मडके मॅडम यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे.त्यांनी शाळेच्या विकासाला लागणाऱ्या अनेक वस्तू व शिक्षणाचे धडे देण्यासाठी शासनाकडून मिळणाऱ्या शिक्षण सामग्री व पोषण आहार शाळेत उत्तमरीत्या चालु केला आहे. यातच आता अजून एक स्मार्ट टीव्ही शाळेला प्राप्त झाल्याने 2 ही वर्गात आता मुलांना डिजिटल पध्दतीने शिक्षण मिळणार आहे.

शाळेच्या विकासासाठी झटणाऱ्या अशा आदर्श शिक्षकांचे गावातील नागरिकांकडुन कौतुक केले जात आहे. यांमुळे बापदेववस्ती शाळा आता 100% डिजिटल शाळा झाली आहे.वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात याचा खूप उपयोग होणार आहे.